खडकवासला धरण ते फुरसुंगी लोणीकाळभोर ३८ किमी भूमिगत बोगद्याच्या कामासाठी लवकरच मंत्रिमंडळाची मान्यता मिळणार..! आमदार राहुल कुल

By : Polticalface Team ,20-08-2024

खडकवासला धरण ते फुरसुंगी लोणीकाळभोर ३८ किमी भूमिगत बोगद्याच्या कामासाठी लवकरच मंत्रिमंडळाची मान्यता मिळणार..! आमदार राहुल कुल

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता २० ऑगस्ट २०२४. पुणे जिल्ह्यातील जलसंपदा विभाग व ऊर्जा विभागाशी संबंधित दौंड तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या मागण्यां बाबत दि.१९ ऑगस्ट रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकी पार पडली या बैठकीमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली खडकवासला धरण ते फुरसुंगी लोणी काळभोर पर्यंत भूमिगत कालवा करण्याच्या प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळावी अशी मागणी करण्यात आली - या आठवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मान्यता देण्यात येईल असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुळशीचे पाणी पूर्वमुखी वळविण्या बाबत आलेल्या सुर्वे समितीचा अहवाल स्वीकारून याबाबत धोरण निश्चित करण्याची मागणी केली त्यावर विभागाने कार्यवाही करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री महोदयांनी दिले जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीमध्ये रूपांतरित करणे व अस्तरीकरण करण्याच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता मिळण्याची मागणी केली - यावर राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीची (SLTAC) ची मान्यता घेऊन तातडीने निविदा प्रक्रिया करावी आशा सूचना उपमुख्यमंत्री महोदयांनी दिल्या राज्यातील चिबड खारवट व पाणथळ शेतजमीन निर्मूलन करण्यासाठी सुधारित धोरण निश्चित करून याबाबत दौंड तालुक्यातील कामांना मान्यता देण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी केली - लोकवर्गणी व इतर निर्बंध शिथिल करण्यात आले असून प्रलंबित प्रस्तावांना मान्यता देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री महोदयांनी दिले दौंड तालुक्यातील उजनी धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रात बुडीत बंधारे बांधण्यासाठी सुधारित धोरण ठरविण्याबाबत तातडीने समिती स्थापन करून धोरण तयार करावे व आवश्यक कार्यवाही करावी आशा सूचना उपमुख्यमंत्री महोदयांनी दिल्या यवत येथील जलसंपदा विभागाची जागा यवत पोलीस स्टेशन इमारत व पोलीस वसाहत बांधकामा करता हस्तांतरित करण्या बाबत देखील उपमुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मकता दाखवली असून लवकरच कार्यवाही होईल असे सांगितले वितरिका क्र. ३२ व ३५ च्या दुरूस्ती कामास ९ कोटी, कुदळेवस्ती (नवीन मुठा उजवा कालवा) चे पुल बांधणेसाठी १ कोटी, राहू को. प. बंधारा संरक्षण भिंत बांधणेसाठी ४.५ कोटी, देऊळगाव राजे को.प. बंधारा दुरूस्ती कामास ४ कोटी, मुळा मुठा व भीमा नदीवरील दहिटणे, पारगाव, सादलगाव, सोनवडी व खोरवडी को.प. बंधारे दुरूस्ती कामांस १५ कोटी निधी बिगर सिंचन मधून मिळावा. अशी मागणी केल्याने त्वरित निधी उपलब्धत करून देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. दौंड तालुक्यातील अतिभारीत उपकेंद्रांची क्षमता वाढविणे, नवीन विद्युत उपकेंद्र निर्माण करणे, तसेच वितरण प्रणाली सक्षमीकरण करणे यासाठी देखील मोठ्या प्रमाणवर निधीची तरतूद राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याची माहिती दौडचे आमदार अँड राहुल कुल यांनी सांगितले. या बैठकीला जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दिपक कपूर, कृष्णा खोरे विकास महा मंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कोपले, दुरदृश्य प्रणालीद्वारे उर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती आभा शुक्ला, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र, संचालक श्री. संजीव कुमार, यांच्यासह जलसंपदा व उर्जा विभागाचे सर्व अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते