यवत पोलीस स्टेशन हद्दीतील अज्ञात चोरट्यांचा बंदोबस्त करा. यवत येथील कॅनोल वरील तीन शेतकऱ्यांच्या १ लाख रुपये किंमतीची पाण्याची मोटरींची चोरी.

By : Polticalface Team ,20-08-2024

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील अज्ञात चोरट्यांचा बंदोबस्त करा. यवत येथील कॅनोल वरील तीन शेतकऱ्यांच्या १ लाख रुपये किंमतीची पाण्याची मोटरींची चोरी.

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता २० ऑगस्ट २०२४ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील तीन शेतकऱ्यांच्या कॅनल वरील मोटार अज्ञात चोरट्यांनी चोरुन त्यातील तांब्याच्या तारा काढून इतर वस्तू त्याच ठिकाणी फेकुन दिल्या असल्याचे दिसून आले आहे. या बाबत यवत येथील शेतकरी अशोक प्रभाकर मलभारे वय ५८ वर्षे, व्यवसाय शेती रा.मलभारे वस्ती यवत ता.दौंड जि.पुणे. यांनी यवत पोलीस स्टेशन येथे दि.१७/०८/२०२४ रोजी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत अधिक माहिती अशी की. यवत खडक वासला कॅनलच्या कडेला आनंदग्राम सोसायटीच्या शेजारी असलेल्या कॅनोल वर 7.5 एस पी ची नविन मोटर. 08/03/2024 रोजी बसवलेली होती. दि 16/08/2024 रोजी सांय 4.30 वा चे सुमारास फिर्यादी त्यांच्या शेतीसाठी खडक वासला कॅनलच्या कडेला असणारी मोटर चालू करून शेतातील उसावर पाणी लावुन घरी गेलो त्या नंतर दि 17/08/2024 रोजी दुपोरी 1.00 वा चे सुमारास उसावर सोडलेले पाण्याचे बारी बदलण्या साठी गेलो असता शेतात पाणी येत नसल्याचे लक्षात आले. तेव्हा फिर्यादी यवत खडक वासला कॅनोल जवळ जाऊन पाण्याची मोटर पाहीली असता तेथे त्यांना मोटर दिसुन आली नाही. तेव्हा आजु बाजुला पाहीले असता त्यांच्या शेजारील शेतकरी संदानंद वामन दोरगे व पोपट राजु दोरगे यांचे देखिल मोटरी दिसुन आल्या नसल्याने फिर्यादी यांनी सदानंद दोरगे व राजु दोरगे यांना फोन करून घटनास्थळी बोलून घेतले. व तिघांनी कॅनल वरील आजु बाजुला इतर ठिकाणी मोटरी शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना त्यांच्या मोटरी मिळुन आल्या नाहीत. तेव्हा फिर्यादीसह तिन्ही शेतकऱ्यांना खात्री झाली कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी संमती शिवाय मुद्दाम लाबाडीच्या इरादयाने २५ हजार रुपये किंमतीच्या फिर्यादी अशोक प्रभाकर मलभारे यांची तारो पंम्स नावाची 7.5 एस पी ची मोटर चोरून नेल्या आहेत. तसेच. 12.5 एस पी असलेली ७० हजार रुपये किंमतीची मोटर. सदानंद वामन दोरगे. आणि ५ हजार रुपये किंमतीची राजेंद्र पोपट दोरगे यांची असे एकूण १ लाख रुपये किंमतीचे कॅनल वरील मोटरी चोरून नेल्या असल्याबाबत फिर्यादीच्या तक्रारीवरून यवत पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल अंमतलदार पो हवा करचे. अंमलदार पो हवा नगरे पुढील तपास करीत आहेत. या बाबत महत्त्वाची बाब म्हणजे यवत पोलीस स्टेशन च्या पाठीमागे हाकेच्या अंतरावर असलेल्या कॅनोल वरील पाणी घेण्यासाठी. शेतकऱ्यांनी मोटर बसविण्यात आल्या होत्या मात्र दि १७ ऑगस्ट रोजी यवत येथील अशोक प्रभाकर मलभारे. सदानंद वामन दोरगे. पोपट राजु दोरगे या शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटरी अज्ञात चोरट्यांनी एकाच दिवशी चोरून त्यामधील तांब्याच्या तारा काढून नेल्याची घटना घडली असल्याने. यवत परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. या बाबत पुन्हा अशी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी शंका व्यक्त करुन रात्रीच्या वेळी परिसरातील शेतकरी शेतात व कॅनोल वर चकरा मारू लागली आहेत.

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते