साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी. यवत गावांतून धुमधडाक्यात मिरवणूक.

By : Polticalface Team ,23-08-2024

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी. यवत गावांतून धुमधडाक्यात मिरवणूक.

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता २३ ऑगस्ट २०२४ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने दि २२ ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी यवत पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री माने यांच्या हस्ते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास व महापुरुषांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. या वेळी यवत गावचे विद्यमान सरपंच मा समीर दोरगे. ग्रामविकास अधिकारी बालाजी सरवदे. ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच रमेश यादव. संदीप दोरगे झोपडपट्टी सुरक्षा दलाचे पुणे जिल्हा अध्यक्ष दत्ता डाडर मातंग नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष. काळुराम शेंडगे. आदी मान्यवर सकाळी ११ वाजे दरम्यान प्रामुख्याने उपस्थित होते.. बहुजनांच्या वेदनांना साहित्यातून वाचा फोडणारे आणि कष्टकऱ्यांच्या व गिरणी कामगारांच्या हक्कांसाठी झगडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावरील लिखित कादंबरी. पोवाडा. लावणी.असे अनेक प्रबोधनात्मक साहित्य आण्णा भाऊंनी लिहून समाजातील शोषीत पिढीत वंचित मजुर कामगारांचा लढा. तसेच महाराष्ट्र एक संघ ठेवण्यासाठी लाल बावटा संघर्ष समिती स्थापन करून मजुर कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकशाहीचा बुलंद आवाज शाहिरीतून महाराष्ट्रच नव्हे तर परदेशातही डफावर थाप टाकुन डंका वाजवला असल्याचे लक्ष्मण मांडरे यांनी व्याख्यानाच्या माध्यमातून उपस्थित फुले शाहू आंबेडकर चळवळीतील युवा तरुणांना मार्गदर्शन केले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवन पटावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. जयंती कार्यक्रमाच्या माध्यमातून ते बोलत होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने दौंड तालुक्यांचे माजी आमदार रमेश अप्पा थोरात यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धावृत्ती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती. यवत गावांतून डिजे फटाक्यांच्या धुम धडाक्यात अण्णाभाऊ साठे यांची अर्धावृत्ती पुतळ्यास रथात बसवून भव्य मिरवणुकी काढण्यात आली. या वेळी महाराष्ट्र राज्य मातंग नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष. मस्कू अण्णा शेंडगे. झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हा अध्यक्ष दत्ता डाडर. दौंड पंचायत समिती सदस्य निशाताई शेंडगे. मातंग नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष काळुराम शेंडगे. ग्रामपंचायतीचे सदस्य राजेश शेंडगे. आर पी आय दौंड तालुका मातंग आघाडीचे माजी अध्यक्ष संजय अडागळे. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सागर शेंडगे. सामाजिक कार्यकर्ते निलेश शेंडगे. तसेच उपाध्यक्ष विशाल साठे. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते बापू जगताप. नवनाथ शेंडगे. रोहित बुजवणे. आदिनाथ शेंडगे. कृष्णा आडागळे. रामभाऊ मोरे. भाऊ शेंडगे. चंदन शेंडगे. आकाश लोंढे. रोहित नेटके. आशुतोष गवळी. संदीप लोंढे. माऊली ससाने. स्वप्निल गायकवाड. करण शिंदे. तसेच दौंड तालुक्यातील फुले शाहू आंबेडकर चळवळीतील विविध सामाजिक राजकीय संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच यवत पंचक्रोशीतील संकल बहुजन मातंग समाज महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते