प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाच्या सहअध्यक्षपदी पालकमंत्री शंभूराज देसाई

By : Polticalface Team ,23-08-2024

प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाच्या सहअध्यक्षपदी पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. २३ (जिमाका) – प्रतापगड किल्ल्याच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरण स्थापन करण्यास शासनाने 19 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता दिली आहे. या प्राधिकरणाचे सहअध्यक्ष म्हणून पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाच्या रचनेमध्ये यापूर्वीच 10 जणांची समिती स्थापन करण्यात आली असून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे या प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. या प्राधिकरण समितीच्या रचनेचा विस्तार करण्यात आला असून पालकमंत्री शंभूराज देसाई यांची सहअध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आला आहे. तर विजय दत्तात्रय नायडू, यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून समावेश करण्यात आलेला आहे. प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाची कार्यकक्षा व अधिकार कक्षेमध्ये प्रतापगड किल्ला जतन व संवर्धन आराखड्यातील शासनाने मंजूर केलेल्या कामांच्या अंदाजपत्रकांना व नकाशांना मान्यता देणे, प्राप्त निधी/आर्थिक स्त्रोताचे वाटप करणे, प्रतापगड किल्ला विकासाच्या मान्यता दिलेल्या आराखड्याप्रमाणे सदरील आराखड्या अंतर्गत निधीचे पुनर्वाटप व पुनर्रचना करणे, प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाच्या कामांच्या प्रगतीचे संनियंत्रण करणे, प्रकल्पांतर्गत निर्माण केलेले विविध घटक कार्यान्वित करणे याबाबींचा समावेश आहे. नियोजन विभागामार्फत मंजूर होणारा आराखडा, जिल्हा नियोजन समिती इ. माध्यमातून प्राधिकरणासाठी निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे. सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील धार्मिक, ऐतिहासिक व निसर्ग पर्यटन स्थळे विकासाचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा अंतर्गत रु 381.56 कोटी रक्कमेच्या आराखड्यास मंजुरी दिलेली आहे. प्रतापगड किल्ला जतन व संवर्धन संबधातील कामकाज प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरण पाहणार आहे.

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते