श्री.सद्गुरू नारायण महाराज यांचे रोटी घाटात स्मारक व्हावे. श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारकरी भवन उभारणार. आमदार राहुल कुल.

By : Polticalface Team ,24-08-2024

श्री.सद्गुरू नारायण महाराज यांचे रोटी घाटात स्मारक व्हावे.  श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारकरी भवन उभारणार. आमदार राहुल कुल.

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता २४ ऑगस्ट २०२४ दौंड तालुक्यातील श्रावणमास निमित्ताने कै.सुभाष आण्णा कुल मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित भव्य भजन स्पर्धेचा बक्षीस वितरण, सन्मान सोहळा व कीर्तन महोत्सव सांगता समारंभ आज यवत ता दौंड जिल्हा पुणे येथे पार पडल्या, या प्रसंगी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज ह.भ.प श्री गुरु पुंडलिक महाराज देहूकर यांचे सुश्राव्य काल्याचे कीर्तन झाले.जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पालखी सोहळा दौंड तालुक्यातून पंढरपूर कडे मार्गस्थ होत असतो. त्यामुळे तालुक्याला देखील मोठा सांप्रदायिक वारसा लाभला आहे. तालुक्यातील वारकरी संप्रदायातील गायक, वादक, भजनी मंडळांना व्यासपीठ मिळावे या हेतूने. भजन स्पर्धा व कीर्तन महोत्सव सांप्रदायिक भजन मालीका कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दौंड तालुक्यातील विविध ठिकाणांहून या स्पर्धेसाठी वारकरी संप्रदायातील एकूण ८० भजनी मंडळानी सहभाग घेताला होता. त्यापैकी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक.श्री.विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ, (स्वामी चिंचोली) द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक. श्री.राजेश्वर भजनी मंडळ,(राजेगाव) तृतीय क्रमांकाचे पारितोषिक. श्री.सावतामाळी भजनी मंडळ.(नानगाव) तसेच उत्तेजनार्थ परितोषिक श्री.विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था, (डाळिंब) स्वरांगण भजनी मंडळ, (गोपाळवाडी) बोराटेवस्ती भजनी मंडळ, (नांदुर ) श्रीराम भजनी मंडळ, (केडगाव) विभागीय विजेते श्री.विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ, (कामठवाडी) भैरवनाथ भजनी मंडळ, (खडकी) नागेश्वर भजनी मंडळ. (पाटस) संत यादव बाबा भजनी मंडळ, (वडगाव बांडे) विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ, (खोर) यादववाडी भजनी मंडळ. खामगाव विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ. (पारगाव) या भजनी मंडळांनी अतिशय उत्कृष्ट प्रकारे गायन वादन करुन उपस्थित वारकरी संप्रदायातील भाविकांचे लक्ष वेधले होते. तालुक्यातील २५० हून अधिक मंदिराच्या समोर सभामंडप बांधकाम जीर्णोद्धार, तसेच मंदिरांसाठी पर्यटन व तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत निधी, मंदिरांना तीर्थक्षेत्र दर्जा मिळवून देणे बाबत. नेहमीच पुढाकार घेतला आहे. दौड तालुक्याच्या सीमेवर असलेल्या पांडवकालीन श्री भुलेश्वर मंदिराला वन पर्यटन मधुन निधी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. श्री क्षेत्र पंढरपूर येथे दौंड तालुक्यातील वारकऱ्यांसाठी. वारकरी भवन नाही. भाविकांच्या सोयीसाठी श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारकरी भवन उभारणार असल्याचे आमदार राहुल कुल यांनी सांगितले. तसेच ह.भ.प श्री गुरु पुंडलिक महाराज देहूकर यांनी मागणी केल्या प्रमाणे रोटी घाटात श्री.सद्गुरू नारायण महाराज यांचे स्मारक उभारणार असल्याचा विश्वास आमदार राहुल कुल यांनी उपस्थितांना दिला. या वेळी माजी आमदार श्रीमती. रंजनाताई कुल, ह. भ. प. गुरुवर्य श्री.सुदाम गोरखे गुरुजी, ह. भ. प. श्री.सुमंत महाराज हंबीर, ह. भ. प. श्री.सुरेश महाराज साठे, ह. भ. प. श्री.गुलाब महाराज लवंगे, ह. भ. प. श्री.नाना महाराज दोरगे, ह. भ. प. श्री. सोळसकर महाराज, ह. भ. प. श्री.दिपक महाराज मोटे, सौ.कांचन कुल यांच्यासह तालुक्यातील सर्व वारकरी कीर्तनकार, मृदुंगचार्य, गायनाचार्य, हार्मोनियम वादक टाळकरी तसेच वारकरी संप्रदायातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते