अनिवासी भारतीय काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी प्रा शंकर गवते यांची नियुक्ती

By : Polticalface Team ,25-08-2024

अनिवासी भारतीय काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी प्रा शंकर गवते यांची नियुक्ती

लिंपणगाव (प्रतिनिधी)-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष मा नानाभाऊ पटोले यांच्या शिफारशीनुसार प्रा शंकर गवते यांची अनिवासी भारतीय काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. 
काँग्रेस पक्षाचे कार्य संपूर्ण जगात 143 देशांमध्ये चालते संपूर्ण जगभर काँग्रेस पक्षाचे ध्येयधोरणे पोहचवणे सामाजिक एकता शांतता जगभरातील लोकांच्या मनामध्ये वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करणे व काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष मा मल्लिकार्जुन खरगे; मा सोनियाजी गांधी; व मा राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे विचार जगभरातील अनिवासी भारतीयांच्यापर्यंत पोहचवण्याचे कार्य करण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाने उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करून  त्या निम्मिताने काँग्रेस पक्षाचे काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी काँग्रेस पक्षाचे आभार व्यक्त केले. 
प्रा शंकर गवते हे प्रेरणादायी व्याख्याते, उत्कृष्ट निवेदक, गायक, मराठी व इंग्रजी विषयावर प्रभुत्व असणारे आहेत. त्यांनी आतापर्यंत शेकडो व्याखाने दिलेली असून; महाराष्ट्रातील वादविवाद व वक्तृत्व स्पर्धेचे विजेते आहेत. महिलांसाठी राज्यभर. गाजत असलेल्या लै भारी होममिनिस्टर खेळ पैठणीचा ह्या कार्यक्रमाचे ते संयोजक आहेत. 
त्यांना काहीच दिवसात काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खरगे; खासदार राहुलजी गांधी; महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते मुंबईत नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे. 
     त्यांच्या नियुक्तीबद्दल मा बाळासाहेब थोरात,मा  जिल्हाध्यक्ष जयंत वाघ; आमदार लहू कानडे; मा  राजेंद्रजी नागवडे; मा घनश्याम शेलार; मा अनुराधा वहिनी नागवडे; मा मनोहर पोटे; युवक अध्यक्ष स्मितल वाबळे; तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर आदींनी अभिनंदन केले आहे.

प्रकाश म्हस्के
संपादक

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते