पुज्य भन्ते तिस्सावरो (हरिश्चन्द्र निवृत्ती पानसरे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने दिल्ली येथे निधन. दिल्लीहून विमान प्रवास. आठवले यांच्या उपस्थितीत पाटस येथे अंत्यविधी.

By : Polticalface Team ,25-08-2024

पुज्य भन्ते तिस्सावरो (हरिश्चन्द्र निवृत्ती पानसरे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने दिल्ली येथे निधन. दिल्लीहून विमान प्रवास. आठवले यांच्या उपस्थितीत पाटस येथे अंत्यविधी.

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता २५ ऑगस्ट २०२४ दौंड तालुक्यातील धम्म प्रचार प्रसारक, व सकाळ वृत्तसेवा पेपरचे नामांकित व्होरा एडिशन पत्रकार आणि वेस्टल्यांड बोरडाचे चेअरमन. वंदनीय, पुज्य भन्ते तिस्सावरो (हरिश्चन्द्र निवृत्ती पानसरे उर्फ बाबा पानसरे यांचे शुक्रवार दि. २३ ऑगस्ट रोजी दिल्ली येथे हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले .

दौंड तालुक्यातील मौजे पाटस ता दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी त्यांचा अंत्यविधी व्हावा या उद्देशाने केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार मा.रामदास आठवले यांच्या सहकार्याने. पुज्य भन्ते तिस्सावरो (हरिश्चन्द्र निवृत्ती पानसरे यांचे शेव दिल्लीहून विमानाद्वारे पुणे येथे तत्काळ आणण्याची वेवस्था करण्यात आली होती. दौंड तालुक्यातील मौजे पाटस ता दौंड जिल्हा पुणे. भीमा पाटस सहकारी साखर कारखाना रोड ते पाटस स्मशान भूमी पर्यंत अंतिम रथ यात्रा काढून त्यांचा अंत्यविधी रविवार दि २५ ऑगस्ट २०२४ रोजी केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार मा.रामदास आठवले साहेब यांच्या उपस्थितीत पार पडला.

या प्रसंगी दौंड तालुक्याचे आमदार अँड राहुल कुल. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे परशुराम वाडेकर. सुर्यकांत वाघमारे गणेश गायकवाड. माजी जिल्हा अध्यक्ष विक्रम शेलार. उपअध्यक्ष रविंद्र कांबळे. तसेच दौंड तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी व पाटस येथिल समस्त ग्रामस्थ आणि रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार मा.रामदास आठवले यांनी पुज्य भन्ते तिस्सावरो (हरिश्चन्द्र निवृत्ती पानसरे उर्फ बाबा पानसरे यांना पुष्पहार अर्पण करून अंतिम संस्काराचा धार्मिक विधी पूर्ण करण्यात आला. अखेर सामुदायिक त्रिशरण पंचशीलाचे पठण करण्यात आले. या प्रसंगी बोलताना ते म्हणाले दोन दिवसापूर्वीच 21 22 रोजी दिल्ली येथे आम्ही भेटलो अचानक असे होईल असे वाटले नव्हते अलीकडच्या काळामध्ये अटॅकचे प्रमाण अधिक वाढले आहे. माणसे बोलता बोलता झोपेमध्ये जेवण करत असताना अचानक अटॅक येऊन अनेक लोक गेले आहेत. बाबा यातून वाचु शकले नाहीत. जगभरामध्ये भ्रमण करणारे बाबा पानसरे आपल्या गावातून त्यांनी समाजवादी आंबेडकरी चळवळीचे नाते जोडले. त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनामध्ये बिहारमध्ये काम केले आहे. दिल्लीची गेले पंधरा वर्षापासून माझी त्यांची ओळख होती. मेघा पाटकर यांच्या आंदोलनामध्ये दिल्लीमध्ये माजी त्यांची भेट झाली होती. त्यावेळी मी लोकसभेचा मेंबर होतो. पंधरा-सोळा वर्षापासून बाबांचे माझे एवढ्या जवळचे संबंध आले असल्याने. रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कमिटी मध्ये त्यांना घेतले होते. काही कार्यक्रमात ते माझ्यासोबत उपस्थित राहायचे माझ्याबद्दल त्यांना विश्वास व प्रचंड प्रेम होते. माझ्याबद्दल टीव्ही वरील देशभरातील अनेक बातम्या कधीकधी ते मला फोनवरून सांगायचे. अत्यंत चाणंक्क्ष बुद्धीचे बाबा होते. पाटस गावचे नाव देशभरामध्ये घेऊन जाणारे बाबा होते. अशी प्रतिक्रिया श्रद्धांजलीच्या रूपात केंद्रीय राज्यमंत्री मा रामदास आठवले यांनी बोलताना व्यक्त केली. दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या सूचनेनुसार. येणाऱ्या दहा तारखेला पुज्य भन्ते तिस्सावरो (हरिश्चन्द्र निवृत्ती पानसरे उर्फ बाबा पानसरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली चा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा. असे त्यांनी उपस्थित आयोजकांना सूचना दिल्या आहेत. या प्रसंगी आमदार अँड राहुल कुल. साहेबराव वाबळे रिपब्लिकन पक्षाचे नेते नागसेन जी धेंडे. डॉ आव्हाड. मिलिंद पानसरे या मान्यवरांनी पुज्य भन्ते तिस्सावरो (हरिश्चन्द्र निवृत्ती पानसरे यांना श्रद्धांजलीच्या माध्यमातून आदरांजली अर्पण करत मनोगत व्यक्त केले. या वेळी दौंड तालुक्यातील फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते