केंद्रीय राज्यमंत्री डॉ रामदास आठवले यांचे यवत येथील भिम सैनिकांनी केले स्वागत. आठवले यांनी उत्कृष्ट चहाचा घेतला स्वाद.

By : Polticalface Team ,26-08-2024

केंद्रीय राज्यमंत्री डॉ रामदास आठवले यांचे यवत येथील भिम सैनिकांनी केले स्वागत. आठवले यांनी उत्कृष्ट चहाचा घेतला स्वाद.

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता २५ ऑगस्ट २०२४ दौंड तालुक्यातील मौजे पाटस येथे पुज्य भंन्ते तिस्सावरो (हरिश्चन्द्र निवृत्ती पानसरे उर्फ बाबा पानसरे यांचे शुक्रवार दि.२३ रोजी दिल्ली येथे हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले असल्याने त्यांचा अंत्यविधीसाठी दि २५ रोजी पाटस येथे आठवले आले होते.

अंत्यविधीचा सर्व कार्यक्रम आटपून परत जाता वेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले साहेब यांनी यवत ता दौंड येथील भिम सैनिकांना भेट दिली. या प्रसंगी दौंड तालुक्याचे माजी उपअध्यक्ष व जन आधार न्यूज दौंड तालुका प्रतिनिधी अनिल गायकवाड. डॉ संतोष बडेकर. माजी पोलीस उपनिरीक्षक बबनराव गायकवाड. प्रभात वृत्त पत्राचे प्रतिनिधी मनोज खंडाळे. पत्रकार संतोष जगताप. पत्रकार संजय सोनवणे. झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष दत्ता डाडर. दिलीप दोरगे. दुध उत्पादक शेतकरी नवनाथ कुडीतकर. यांनी गुलाब पुष्पगुच्छ देऊन रामदास आठवले यांचे स्वागत केले.

या वेळी यवत पंचक्रोशीतील जेष्ठ नागरिक युवा तरुण कार्यकर्ते तसेच सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी मान्यवरांनी केंद्रीय राज्यमंत्री डॉ रामदास आठवले यांच्याशी संवाद साधला. कासुर्डी जावजीबुवाची वाडी येथील दुध उत्पादक शेतकरी नवनाथ कुडीतकर यांनी दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडीअडचणी बाबत व्यथा मांडल्या. या प्रसंगी यवत येथील चहाचा स्वाद घेऊन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यवत येथील उत्कृष्ट चहाचा स्वाद घेऊन कौतुक करत समाधान व्यक्त केले.

दौंड तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाची परस्तीती पाहता ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना विचारात घेतले जात नसल्या बाबत खंत व्यक्त कली. स्थानिक पातळीवर युवा तरुणांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. दौंड तालुक्यातील महायुतीचे राजकारण फक्त वरच्या फळीत चालले असल्याचे अनेक वेळा उघडकीस आले असल्याची दौंड तालुक्यातील युवकांमध्ये चर्चा आहे. या बाबत दौंड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट. पुढील येणाऱ्या विधानसभा नगर परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणूक दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मा.सुप्रिया सुळे यांना तत्पूर्वी निवेदनाद्वारे जाहीर पाठिंबा दिला होता. आता पुढे काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रसंगी पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतूक व्यवस्था नियंत्रित ठेवण्यासाठी यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी यवत पोलीस स्टेशनचे पाच पोलीस कर्मचारी हायवे रोडवर तैनात करण्यात आले होते. या वेळी पुणे सोलापूर महामार्ग पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.

अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते