29 ऑगस्ट रोजीच्या शासकीय निमशासकीय राज्यव्यापी संपात शिक्षकेतर महासंघ सहभागी होणार राज्य महासचिव पाराजी मोरे

By : Polticalface Team ,26-08-2024

29 ऑगस्ट रोजीच्या शासकीय निमशासकीय राज्यव्यापी संपात शिक्षकेतर महासंघ सहभागी होणार राज्य महासचिव पाराजी मोरे

लिंपणगाव( प्रतिनिधी )- 29 ऑगस्ट 2024 रोजी च्या शासकीय; निमशासकीय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी राज्य संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी संपामध्ये व्हावे असे; आवाहन राज्य शिक्षकेतर महासंघाचे राज्य महासचिव पाराजी मोरे यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे. महाराष्ट्र राज्य शासकीय व निमशासकीय कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या समन्वय समितीने सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी; या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी दिनांक 29 ऑगस्ट 20२४ रोजी संपाची हाक दिलेली आहे. प्रसिद्धी पत्रकामध्ये नमूद सर्व मागण्यांबरोबरच राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना १२/ 24 राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे दिनांक १ ऑक्टोबर 2006 पासून पूर्व लक्षी प्रभावाने लागू करावी या मागणीचा समावेश करण्याबाबत राज्य शिक्षकेतर महासंघाने आग्रह धरलेला होता. याबाबत प्रधान सचिव वित्त विभाग यांची वेळ निश्चित करून चर्चा घडवून मार्ग काढण्याबाबत दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी महासंघास आश्वासित केलेले आहे. पुढे या निवेदनात जिल्हाध्यक्ष पाराजी मोरे यांनी म्हटले आहे की; महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महासंघ हा मध्यवर्ती कर्मचारी संघटना समन्वय समितीचा अधिकृत सदस्य आहे. दिनांक 29 ऑगस्ट 2024 पासून काढलेल्या संपामध्ये शिक्षकेतर महासंघाने सक्रिय सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढे या निवेदनात महासचिव पाराजी मोरे यांनी आणखी म्हटले आहे की; राज्यातील सर्व जिल्हा व तालुका पातळीवरील अध्यक्ष; सचिव व कार्यकारिणी सदस्य तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या संपात सक्रिय सहभाग घेऊन शाळेतील शिक्षकांचे निवेदनासोबत आपले निवेदन सादर करावीत. संप काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी; संपूर्ण संप शांततेच्या मार्गाने पार पाडावा. व सनदशीर मार्गाने आपल्या मागण्या मान्य करण्यास शासनास भाग पाडावे असे आवाहन राज्य शिक्षकेतर महासंघाचे राज्य अध्यक्ष वाल्मीक सुराशे; कार्याध्यक्ष केशव पाटील व महासचिव शिक्षकेतर महासंघाचे पाराजी मोरे राज्य उपाध्यक्ष राजू पठाण जिल्हा शिक्षकेतर महासंघाचे ज्यष्ठ मार्गदर्शक समशेर भाई पठाण यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे.

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते