सभासद व ऊस उत्पादकांची चालू वर्षाची दिवाळी गोड करणार- अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे

By : Polticalface Team ,27-08-2024

सभासद व ऊस उत्पादकांची चालू वर्षाची दिवाळी गोड करणार- अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे

  लिंपणगाव (प्रतिनिधी)-- साखर कारखान्याचे सभासद; व ऊस उत्पादकांची चालू वर्षीची दिवाळी गोड करणार असे आश्वासन सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांनी आयोजित वार्षिक सभेत बोलताना दिले. 

   सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची सन २०२३२४ या आर्थिक वर्षाची आदी मंडळाची 59 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेपुढे एक ते दहा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. त्या सर्व विषयांना सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. 


       सभेचे कामकाज सुरू होताना अहवाल सालात निधन झालेल्या कारखान्याच्या दिवंगत सभासदांना श्रद्धांजली वाहून सभेचे कामकाज सुरू करण्यात आले. 

   व्यासपीठावर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस; राज्य बाजार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब नहाटा;  राज्य पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे; काँग्रेस नेते घनश्याम शेलार, दीपक शेठ नागवडे; बाबासाहेब इथापे; केशवराव मगर; अरुणराव पाचपुते; जिजाबापू शिंदे; हरिदास शिर्के; प्रेमराज भोईटे; टिळक भोस; धनसिंग भोईटे पाटील; प्रमोद शिंदे; संदीप नागवडे; लक्ष्मणराव नलगे; माणिकराव पाचपुते आदी उपस्थित होते.

        प्रामुख्याने सर्वसाधारण सभेत कारखान्याचे संचालक प्रशांत दरेकर; पोपटराव ठाणगे ऋषिकेश भोईटे; श्रीपाद खिस्ती; त्रिंबक मुठाळ सोन्याबापु कुरुमकर; हरिचंद्र धांडे; राजेंद्र भोस; संग्राम पवार; सुनील जंगले; शहाजी गायकवाड; शिवदास जाधव; नाना कणसे; किरण नागवडे; सुनील जाधव; रामभाऊ रायकर आदींनी चर्चेत सहभाग घेतला. 

      याप्रसंगी युवक कार्यकर्ते किरण नागवडे यावेळी म्हणाले की; सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापूंनी या दुष्काळी तालुक्यात मोठ्या संघर्षातूनही सहकार चळवळ उभी केली. त्यामुळे शेतकरी कष्टकरी व सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावले आहे. या संस्थेला जवळपास ५९ वर्ष झाले. बापूंच्या नंतर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांनी ही संस्था ताठ मानेने चालवली. राज्यात  नागवडे कारखान्याचा नावलौकिक आहे. त्यामुळे या सहकारी संस्थेत कोणीही राजकारण आणू नये; अशी अपेक्षा व्यक्त केली. 

      याप्रसंगी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब इथापे; केशवराव मगर; काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार यांनी सभासद व कारखान्याच्या हितासाठी काही मौलिक सूचना व्यक्त केल्या. 

     अध्यक्ष स्थानावरून बोलताना कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांनी सहकार महर्षी बापूंना अभिवादन करत म्हणाले की; या कारखान्याचे जवळपास 30 हजार सभासद आहेत. त्यापैकी साडेसात हजार सभासदांचाच ऊस गाळापाला येत असेल तर त्याचा गाळ पावर मोठा परिणाम होतो. परिणामी कारखान्याची रिकवरी देखील कमी होते. असे सांगून नागवडे पुढे म्हणाले की; कारखान्याची जेवढी रिकवरी जास्त इतका ऊस भाव दिला जातो हे सहकाराचे सूत्र आहे असे सांगून श्री नागवडे पुढे म्हणाले की; नागवडे कारखान्याची उभारणी झाल्यापासून सभासदांना सहकार महर्षी बापूंच्या प्रमाणेच आम्ही देखील सन्मानाची वागणूक देत आहोत. .नागवडे कारखाना साडेपाच हजार मेट्रिक टनाने चालायला हवा; परंतु ऊस उत्पादक उस व सभासद हे बाहेरील कारखान्यांना ऊस पाठवतात. त्यामुळे कारखाना गाळप हंगामात साडेचार हजार मेट्रिक टनाने चालवावा लागतो. आगामी काळात हंगामात ऊस तोडी बाबत सुसूत्रता येण्यासाठी शेतकी विभागाला सक्त सूचना केल्या जातील. असे सांगून नागवडे आणखी पुढे म्हणाले की; बाहेरील कारखाने हे ऊसतोड मजुरांना जास्तीचे ऊसतोड अमिष दाखवतात; त्यामुळे आपल्या कारखान्याकडे ऊसतोड मजूर येत नाहीत. त्याचा कारखान्याच्या ऊस ऊसतोडणीवर परिणाम होत आहे. 

     नागवडे आणखी पुढे म्हणाले की; केंद्र सरकारने देशात प्रमाणा पेक्षा जास्त इथेनॉल निर्मितीचे उत्पादन झाल्याने बंधने घातली. त्यामुळे कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पातून फक्त 12 टक्केच उत्पादन झाले. त्यामुळे केंद्राच्या आदेशाने डिस्टलरी प्रकल्प बंद ठेवावा लागला. त्यामुळे कारखान्याचे ४ कोटी 39 लाख रुपयाचे नुकसान झाले. असे देखील नागवडे यांनी यावेळी सांगितले. नागवडे यांनी आणखी पुढे म्हटले आहे की; सभासदांनी पुढच्या वर्षी 18 लाख गाळप करण्यासाठी ऊस पुरवावा बाहेरील कारखान्यापेक्षाही आपण अधिक ऊस भाव देऊ असे आश्वासनही नागवडे यांनी दिले. बापूंनी ज्या पद्धतीने सहकार चालवला; वाढवला त्याच पद्धतीने कारखान्याचे संचालक मंडळ काम करत आहे. ही सहकाराची कामधेनु टिकवण्यासाठी ऊस उत्पादक व सभासदांनी आपल्याच कारखान्यालाच द्यावा; सभासदांच्या ही विश्वासाला संचालक मंडळ तडा जाऊ देणार नाही. चालू वर्षी सभासदांना दीपावलीसाठी चांगल्या प्रतीची साखर देऊ असे आश्वासन देत नागवडे म्हणाले की; चालू वर्षाची दीपावली ऊस उत्पादक सभासदांना गोड करणार असल्याचे आश्वासनही नागवडे यांनी यावेळी जाहीर केले. 

       सूत्रसंचालन माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक सुभाषराव शिंदे यांनी केले. आभार संचालक भाऊसाहेब नेटके यांनी मानले.

प्रकाश म्हस्के
संपादक

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते