दौंड विधानसभा शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत. यवत जिल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय बॅग वस्तूंचे साहित्य वाटप.

By : Polticalface Team ,29-08-2024

दौंड विधानसभा शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत. यवत जिल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय बॅग वस्तूंचे साहित्य वाटप.

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता २९ ऑगस्ट २०२४ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ मधिल गरजू विद्यार्थी मुला मुलींना शालेय बॅग वस्तूंचे वाटप करण्यात आले. शिवसेना दौंड विधानसभेच्या वतीने यवत येथे शिवसेना जिल्हाप्रमुख महेश दादा पासलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ७५ गरजू विद्यार्थी मुला मुलींना शालेय बॅग वस्तूंचे वाटप कार्यक्रम दि २९ ऑगस्ट रोजी यवत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत करण्यात आला होता. शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख महेश दादा पासलकर उपजिल्हाप्रमुख विजयसिंह चव्हाण, शिवसेना तालुका संघटक सचिन दोरगे, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख हनुमंतराव निगडे, यवत ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य नाथा आबा दोरगे, माजी पोलीस उपनिरीक्षक बबनराव गायकवाड. युवासेना तालुका प्रमुख शुभम माळवे, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ डाडर, शिवसेना केडगाव शहर प्रमुख आशिष गायकवाड, शिवसेना तालुका प्रसिद्ध प्रमुख राहुल फडके,या मान्यवरांचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने शाल देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री रामभाऊ दोरगे यांनी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले यवत परीसरात एकुण १५ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहेत. त्यामध्ये एकुण १ हजार ५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेतील सर्व विद्यार्थी मुला मुलींना शासनाच्या वतीने पुस्तक व गणवेश देण्यात येतात मात्र काही गरजू विद्यार्थ्यांना इतर वस्तू अवश्यक आहेत. यवत ग्रामपंचायतच्या वतीने काही दिवसांपूर्वीच इमारत बांधकाम करण्यात आले आहे. तसेच रंगरंगोटी देखील करण्यात आली असून विद्यार्थी मुला मुलींना स्वच्छतागृह नव्याने उभारण्यात आली आहे. यवत पंचक्रोशीतील सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील तसेच उद्योजक मान्यवर नेहमी जिल्हा परिषद शाळेला मदत करत असतात त्यामुळे यवत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी मुला मुलींचे अभ्यासक्रमाने गुणवत्ता अधिक वाढली आहे. तसेच संगणीकरण तांत्रिक शिक्षण मुला मुलांनी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश दादा पासलकर बोलताना म्हणाले. हा उपक्रम फक्त यवत शाळेच्या मर्यादित नाही तर दौंड तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राबविण्यात आला आहे. शासनाच्या वतीने पुस्तक आणि गणवेश दिले जातात मात्र वह्या व इतर साहित्य विद्यार्थी मुला मुलींना आवश्यक आहेत या विषयी राज्याचे मुख्यमंत्री मा एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी तत्काळ या विषयाला संमती दर्शवली. काही हारकत नाही. परंतु हा उपक्रम सर्वांपर्यंत पोहोचेल अशी वेवस्था करा असे त्यांनी सांगितले. दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय बॅग इतर साहित्य वस्तू वाटपाचा कार्यक्रम आखण्यात आला. या बाबत पूर्वी यवत येथील कार्यक्रमात सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे आज यवत येथे सुरुवात केली असुन. तालुक्यातील प्रत्येक शाळेत हा उपक्रम राबविला जात असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख महेश दादा पासलकर यांनी सांगितले. या वेळी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष दत्ता डाडर. यवत ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य नाथा आबा दोरगे यांनी ही मनोगत व्यक्त केले. या वेळी यवत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ चे मुख्याध्यापक रामभाऊ दोरगे सर शिक्षक प्रशांत शितोळे. संजय कुंजीर. गणेश खेडेकर. रवींद्र तांबट. मल्लिनाथ शिंगे. उपस्थित होते. तसेच या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा एकनाथ शिंदे. शिवसेना गटाचे जिल्हा अध्यक्ष महेश दादा पासलकर यांच्या उपस्थितीत दौंड तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थिती दर्शविली यामध्ये प्रामुख्याने उपजिल्हाप्रमुख विजयसिंह चव्हाण, शिवसेना तालुका संघटक सचिन दोरगे, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख हनुमंतराव निगडे, यवत ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य नाथा आबा दोरगे, माजी पोलीस उपनिरीक्षक बबनराव गायकवाड. युवासेना तालुका प्रमुख शुभम माळवे, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ डाडर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे दौंड तालुका माजी उपअध्यक्ष अनिल गायकवाड. शिवसेना केडगाव शहर प्रमुख आशिष गायकवाड, शिवसेना तालुका प्रसिद्ध प्रमुख राहुल फडके, शिवसेनेचे दिलीप दोरगे, युवराज बंड, पोपटराव दोरगे, दिगंबर दोरगे, दादा मलभारे, अमित पवार, अशोक जाधव, शरद निकाळजे, विकास बधे व इतर दौंड तालुक्यातील शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते