छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवण येथे कोसळला या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाटस पोलीस स्टेशन येथे दिले निवेदन.

By : Polticalface Team ,29-08-2024

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवण येथे कोसळला या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाटस पोलीस स्टेशन येथे दिले निवेदन.

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता २९ ऑगस्ट २०२४ दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने युवा तरुणांनी केला निषेध व्यक्त. या बाबत अधिक माहिती अशी की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवण येथे कोसळला या घटनेच्या निषेधार्थ दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते दिग्विजय जेधे यांच्या नेतृत्वाखाली मौजे पाटस ता दौंड जिल्हा पुणे येथील छत्रपती शिवाजी चौक या ठिकाणी निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जेधे म्हणाले, मालवणची घटना आपल्या सर्वांसाठी अतिशय दुरदैवी आहे. आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावणारी ही घटना आहे. महायुतीच्या भ्रष्ट कारभारामुळे आज हा काळा दिवस सर्व शिव प्रेमींना पाहावा लागला. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या संदर्भात घडलेली घटना महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असावी. या बाबत पुतळ्याची सदोष आणि निकृष्ट दर्जाची निर्मिती करणाऱ्या कंत्राटदार जयदीप आपटे यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी. याला कायद्याच्या चौकटीत असलेल्या गुन्ह्यातील कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी आंदोलकांनी पाटस पोलिस स्टेशन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते दिग्विजय जेधे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून दि २९ ऑगस्ट रोजी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण येथे पुतळा कोसळला या घटनेच्या निषेधार्थ दिलेल्या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या स्वाक्षरी केल्या असून. या निवेदनात संतापजनक घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. हे निवेदन देण्यासाठी पारगाव. नानगाव. कानगाव. पाटस. पंचक्रोशीतील सर्व युवा शिवभक्त. छत्रपती शिवाजी महाराज चौक पाटस ता दौंड येथे उपस्थित होते. या वेळी केतन वयभासे. ओमकार शिंदे. आदित्य पोळेकर. निलेश कथले. संदिप शितोळे. शरद साळुंके. यश जेधे. संदीप शिंदे. अक्षक्य दिवेकर. सचिन दिवेकर. राकेश शेळके. प्रामुख्याने उपस्थित होते.

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते