स्वाभिमानी मराठा महासंघाच्या अहिल्या नगरसोशल मीडिया जिल्हाअध्यक्ष पदी रवींद्र शिरसाठ पाटील यांची नियुक्ती

By : Polticalface Team ,30-08-2024

स्वाभिमानी मराठा महासंघाच्या अहिल्या नगरसोशल मीडिया जिल्हाअध्यक्ष पदी रवींद्र शिरसाठ पाटील यांची नियुक्ती

लिंपणगाव (प्रतिनिधी)- स्वाभिमानी मराठा महासंघ मराठा समाजाचे अराजकीय व्यासपीठ आहे. कुणी कुठल्याही पक्षात रहा! फक्त मराठा म्हणून स्वाभिमानी मराठा महासंघात सामील व्हा! असे धोरण घेऊन संघटना देश पातळीवर काम करत आहे. याच धर्तीवर स्वाभिमानी मराठा महासंघाच्या अहिल्यानगर सोशल मीडिया जिल्हाअध्यक्ष पदी रवींद्र शिरसाठ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती पत्र संघटनेचे संस्थापक डॉ कृषिराज टकले पाटील यांनी दिले. रवींद्र शिरसाठ पाटील यांनी निवडी प्रसंगी सांगितले की, मराठा समाजातील बेरोजगारी वाढत आहे. समाजातील शेतकरी, तरुण आत्महत्या सारखे टोकाचे निर्णय घेत असल्याने मराठा आरक्षण समाजासाठी वाघिणीचे दूध आहे. त्यामुळे संघटना मराठा आरक्षण मिळवणारच. रवींद्र शिरसाठ पाटील यांची अहिल्यानगर सोशल मीडिया जिल्हाअध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल स्वाभिमानी मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मराठा रामनारायण, राष्ट्रीय उपाध्यक्ष निलेश धुमाळ पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस राजबीर सिंह, राष्ट्रीय चिटणीस सलील सुर्यवंशी, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष दिपक पवार, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा अनिता ताई पाटील, प्रदेश कार्याध्यक्षा अमृता पठारे, राष्ट्रीय अध्यक्ष कोकिळा ताई पवार, युवा आघाडी प्रदेश अध्यक्ष अभिजित खैरे, प्रदेश कार्याध्यक्ष लखन घाडगे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष रुपेश दळवी, दक्षता आघाडी प्रदेशाध्यक्ष शिवशंभू प्रिया जांभळे सरकार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अलका सोनवणे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सिताताई जाधव, पुणे जिल्हा अध्यक्ष देवदत्त पोखरकर,पुणे शहर अध्यक्ष सवित खोजे, अहिल्यानगरचे जिल्हा अध्यक्ष भानुदास वाबळे पाटील आदिंनी स्वागत केले आहे. चौकोनात घ्यावे या निवडीप्रसंगी मा रविभाऊ शिरसाठ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की; मराठा आरक्षण ही काळाची गरज आहे, ते आरक्षण आम्ही मिळवण्यासाठी वाटेल तो संघर्ष करण्यासाठी तय्यार आहोत., संपूर्ण जिल्ह्यातील मराठा बांधवांना विनंती आहे की; आपण संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे यांच्या अभूतपूर्व लढ्याला बळ द्या! आणि आमच्या स्वाभिमानी मराठा सेवा संघात सामील व्हा! असे शिरसाठ यांनी सांगितले.

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते