२८ सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस साजरा करावा-स्वप्निल कांबळे

By : Polticalface Team ,31-08-2024

२८ सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस साजरा करावा-स्वप्निल कांबळे

जनआधार न्युज बारामती प्रतिनिधी भिमसेन जाधव मो.9112131616 बारामती दि.29:* माहिती अधिकार अधिनियम २००५ कायदा देशभरात २००५ सालापासून लागू आहे. महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी जाणीवपूर्वक उचललेल्या पावलांमुळे अल्पावधीतच महाराष्ट्र राज्यात हा कायदा लक्षणीय स्वरूपात लोकाभिमुख झाला आहे. तरीदेखील नजीकच्या काळात अधिकारीवर्गाच्या उदासीनतेने आपल्या तालुक्यात दिनांक २८ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन म्हणून लुप्त होत चालला आहे. बारामती तालुक्यात माहिती अधिकार अधिनियम कायद्याच्या व्यापक प्रसिद्धीकरिता व प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुकास्तरावर सर्वतोपरी उपाययोजना करण्यात याव्यात, शासन परिपत्रकानुसार दि. २८ सप्टेंबर रोजी बारामती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करण्यात यावा, तसेच या दिवशी माहिती अधिकार कायद्यातील तरतुदी व कार्यपद्धतीबाबतची माहिती विविध माध्यमातून व्यापक प्रसिद्धी देऊन व विविध उपक्रम राबवून बारामती तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत व शासकीय कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवावी; तसेच तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळा, महाविद्यालय, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, इतर शैक्षणिक संस्थांमध्ये माहिती अधिकार विषयावर आधारित निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चर्चासत्र, व्याख्यानमाला कार्यक्रमांचे आयोजन करावे. सर्व शासकीय कार्यालयांत बारामती तालुक्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते व अशासकीय समाजसेवी संस्था, सामाजिक संस्था यांच्या मदतीने प्रत्येक कार्यालयातील माहिती अधिकार कायदा व अधिनियम २००५ चे प्रशिक्षण, चर्चासत्र, व्याख्यानमाला आयोजित करण्यात याव्यात. या सर्व मागण्यांसाठी उचित आदेश पारीत करावेत, असे निवेदन माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल कांबळे यांनी गुरुवार (दि. 29 ऑगस्ट) बारामती उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांना दिले आहे.

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते