१९६४ अगोदर हिंदुत्वाचा प्रचार प्रसार आपणच करत होतो. मंग विश्व हिंदू परिषद कशाला पाहिजे.हि काळाची गरज आहे. ह.भ.प.बंडातात्या कराडकर.

By : Polticalface Team ,31-08-2024

१९६४ अगोदर हिंदुत्वाचा प्रचार प्रसार आपणच करत होतो. मंग विश्व हिंदू परिषद कशाला पाहिजे.हि काळाची गरज आहे. ह.भ.प.बंडातात्या कराडकर.

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता ३० ऑगस्ट २०२४ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे. विश्व हिंदु परिषद पश्चिम प्रांत महाराष्ट्र प्रदेश बारामती जिल्हा दौंड प्रखंड विश्व हिंदु परिषदेच्या स्थापना ६० वर्ष पुर्ती निमित्त हिंदु महासंमेलन. शुक्रवार दि. ३०/०८/२०२४ रोजी सायंकाळी ६ वाजे दरम्यान यवत येथील विद्या विकास मंदिर शाळेचे मैदान या ठिकाणी. विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, सकल हिंदु समाज यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व पाहुणे कालिपुत्र कालिचरण महाराज तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर गुरुवर्य ह.भ.प.बंडातात्या कराडकर.यांचे गणेशराव आखाडे (जिल्हाध्यक्ष विश्व हिंदू परिषद) व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष मा.गणेशराव आखाडे यांनी प्रस्तावनेच्या माध्यमातून आपले मनोगत व्यक्त केले.

या वेळी गुरुवर्य ह.भ.प.बंडातात्या कराडकर. बोलताना म्हणाले आज एक सुंदर योगावरती माझी कालीचरण महाराज यांची भेट होतेय. वैयक्तिक माझं हे सौभाग्य आहे. आपण हिंदू धर्माचा अतिशय कडवा प्रत्यार्थ आहात. मला जेव्हा या कार्यक्रमाचे निमंत्रिण देण्यात आले त्या वेळी मी आनंदाने ते स्वीकारले. विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेला आज ६० वर्ष होत आहेत. त्यानिमित्ताने मागच्या काही घटना याचं स्मरण करणे गरजेचे आहे. विश्व हिंदू परिषद या हिंदुत्ववादी संघटनेची स्थापना १९६४ साली झाली. याच्या अगोदर हिंदुत्वाचा प्रचार प्रसार आपण च करत होतो. विश्व हिंदू परिषद संघटना कशाला पाहिजे. यामागे महत्वाचे कारण आहे.

६० वर्षांपूर्वी दक्षिण भारतामध्ये मीनाक्षी पुरम या एका छोट्या गावात. एक भयंकर मोठा प्रकार घडला. त्या गावातील सर्व नागरिकांचं सामूहिक धर्मांतर घडवण्यात आलं काही लोकांच्यावर जबरदस्ती करण्यात आली. हे धर्मांतर सगळ्या देशांनं पाहिलं तेव्हा सगळ्या देशांमध्ये भयंकर थरकाप उडाला. अशी धर्मांतर होत राहिली तर आपल्या धर्माला केवढा मोठा धोका आहे. ही घटना वाईट आहे पण त्यातून एक चांगली घटना घडली. हिन्दू जन जागृतीसाठी व संरक्षणासाठी विश्व हिंदू परिषद या एका चांगल्या संस्थेचा उगम झाला असल्याचे ह.भ.प.बंडातात्या कराडकर त्यांनी बोलताना सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते (कालिपुत्र) मा कालिचरण महाराज यांनी विश्व हिंदु परिषद व बजरंग दल या संघटनेच्या वतीने हिन्दू धर्मा बद्दल आपले मनोगत व्यक्त करताना दौंड तालुक्यातील व यवत पंचक्रोशीतील उपस्थित नागरीकांचे लक्ष वेधले होते. पुढे बोलताना ते म्हणाले गणेश उत्सव. राम नवमी मिरवणूक असली की मज्जिदच्या बाजूला वीस पंचवीस पोलीस का ? उभी राहतात. मुसलमानांच्या संरक्षणासाठी पोलिस तीथे उभे राहिलेत का ? या ब्रह्मत राहायचं नाही. हमारे तरफ से उनको कोई खतरा नही है. त्यांच्याकडून मिरवणुकीवर दगडफेक होते. म्हणून छातीवर दगड गोटे खाण्यासाठी पोलीस तिथे उभे असतात. सगळ्यात पहिले कोण मरले जाणार पोलीस. मंग आपण. जो पर्यंत खाकी मायबाप आहे ना. तोवर बरं आहे.

मोदीला पुष्कळ लोकं संल्ला देतात एक बार तो युद्ध कर ही डालो. मोदी युद्ध का करत नाही यामागे ही कारण आहे. जसे की एखाद्या ठिकाणी दंगल झाली की पोलिसांच्या मदतीला सेनेतील जवान येतात. तसेच भारताच्या बॉर्डरवर युद्ध सुरू झाल्यावर सारी सेना कुठे लागणार बॉर्डरवर. आणं इथ आपल्या घरात दंगली होतील  घणाघाती टीका कालीचरण महाराज यांनी बोलताना व्यक्त केली. 

या प्रसंगी यवत पंचक्रोशीतील सर्व सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. या प्रसंगी यवत पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी स्वतः उपस्थित राहुन सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी अधिक पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ( दौंड तालुक्यातील आजी माजी आमदार तसेच राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी मांन्यवरांनी यवत येथील विश्व हिंदु परिषदेच्या ६० वर्षपुर्ती हिंदु महासंमेलन कार्यक्रमाला पाठ फिरवली असल्याची उपस्थितांमध्ये चर्चा होती.)

या प्रसंगी प्रमुख उपस्थिती डॉ. प्रविणजी दवडगाव (प्रांत कार्यवाहक पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) मा.किशोरजी चव्हाण (प्रांत मंत्री विश्व हिंदू परिषद) मा. मिलिंद जी वायकर (प्रांत सहसंयोजक धर्मजागरण) मा. पुरुषोत्तम महाराज मोरे (अध्यक्ष देहू संस्थान) मा.सतीश जी गोरडे (सहमंत्री विश्व हिंदू परिषद) मा. पोपटरावजी शिंदे (जिल्हा कार्यवाहक रा. स्वयं. संघ) मा. माणिक महाराज मोरे (सोहळा प्रमुख) मा. हरिभाऊ देवकर (जिल्हा मंत्री बारामती) मा. भाऊ खळदे मा. नंदू अवचट (दौंड प्रखंड सहमंत्री) मा. गणेश पाचपुते (दौंड प्रखंड सहमंत्री) (दौंड तालुका सहकार्यवाहक) हभप नानासाहेब दोरगे महाराज. बाळासो तात्या लाटकर. मा.नितीनजी वाटकर (विभाग मंत्री विश्व हिंदू परिषद) मा.गणेशराव आखाडे (जिल्हाध्यक्ष विश्व हिंदू परिषद) मा. पंडितआण्णा मोडक (प्रखर हिंदुत्ववादी कार्यकर्ते) मा. अक्षयजी देवकाते (जिल्हा संयोजक) मा. महेश जी दोरगे (जिल्हा संयोजक बजरंग दल) मा. राजेंद्र खेत्रे (दौंड तालुका कार्यवाहक रा. स्वयं, संघ. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन खोपडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले विश्व हिंदु परिषद स्थापना ६० वर्षपुर्ती हिंदु महासंमेलन कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रामुख्याने दौंड तालुका ग्रामीण भागातील युवा तरुणांनी व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.

अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते