जाऊजी बुवाचीवाडी ते होलेवाडी,बोरीऐंदी रस्ता दुरुस्ती बाबत. दौंड तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने धडक मोर्चा व आमरण उपोषणाचा इशारा.

By : Polticalface Team ,01-09-2024

जाऊजी बुवाचीवाडी ते होलेवाडी,बोरीऐंदी रस्ता दुरुस्ती बाबत. दौंड तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने धडक मोर्चा व आमरण उपोषणाचा इशारा.

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता ३१ ऑगस्ट २०२४ दौंड तालुक्यातील मौजे जाऊजी बुवाचीवाडी ते होलेवाडी, बोरीऐंदी रस्ता व मुळामुठा नवीन कालव्या वरील पूल दुरुस्ती बाबत दौंड तालुका जिजाऊ ब्रिगेड च्या तालुकाअध्यक्षा सारिकाताई भुजबळ व संघटनेच्या रणरागिणींनी दौंड तहसीलदार मा अरुण शेलार व दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांना जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने दि ३० ऑगस्ट २०२४ रोजी निवेदनाद्वारे आमरण उपोषण व संबंधित कार्यालय ठिकाणी मोर्चा बाबत इशारा देण्यात आला आहे. या बाबत अधिक माहिती अशी की मागील काही दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या रस्त्यासाठी दीड कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. मात्र अघ्याप ही जाऊजी बुवाचीवाडी ते होलेवाडी, बोरीऐंदी रस्ता व मुळामुठा नवीन कालव्या वरील पूल दुरुस्तीचे काम. सुरू करण्यात आले नाही. हि मोठी शोकांतिका असल्याचे सारिकाताई भुजबळ यांनी बोलताना सांगितले. पुढे त्या म्हणाल्या सदर ठिकाणचा रस्ता वाहतूकीस धोकादायक असुन या रस्त्याने महिला विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांची सतत वर्दळ असते. पुणे जिल्हा नियोजन समिती, तसेच दौंड पंचायत समिती सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी यांनी तत्काळ दखल घेऊन या बाबत चौकशी करण्यात यावी. व तातडीने काम सुरू करण्यात करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. येत्या पंधरा दिवसात या कामा बाबत दखल घेण्यात आली नाही तर लोकशाहीच्या मार्गाने दौंड येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालया समोर हजोरोंच्या संख्येने धडक मोर्चा काढुन आमरण उपोषण सुरू करण्यात येईल याची संबंधित विभागाने दखल घ्यावी. असा इशारा दौंड तालुका जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते