प्राचार्य पुराणे व पत्रकार कुरुमकर यांचा व्यंकनाथ विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीकडून सन्मान

By : Polticalface Team ,02-09-2024

प्राचार्य पुराणे व पत्रकार कुरुमकर यांचा व्यंकनाथ विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीकडून सन्मान

     लिंपणगाव( प्रतिनिधी )-श्री व्यंकनाथ विद्यालयाचे प्राचार्य श्री ए. एल. पुराने व ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांचा श्री व्यंकनाथ विद्यालयाच्या स्कूल कमिटीच्या पदाधिकारी यांनी यथोचित असा सन्मान केला.

       यावेळी गौरवद्गारपर भाषणात ग्रामपंचायत सदस्य नीलिमा थोरात यावेळी म्हणाल्या की; प्राचार्य श्री आनंदा पुराणे सर यांनी श्री व्यंकनाथ विद्यालयात शिक्षक म्हणून आदर्शवत असे ज्ञानदानाचे काम करून उत्कृष्ट गुणवंत विद्यार्थी घडविले. त्यांना शिक्षण संस्थेने मागील महिन्यामध्ये याच विद्यालयात प्राचार्य म्हणून पदोन्नती दिली. निश्चितच अभिमानाची बाब आहे. प्राचार्य पुराने यांनी अध्यापनाचे काम करत असताना जादा तासाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. त्यातून अनेक विद्यार्थी उच्चपदस्थ अधिकारी व विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्याचे श्रेय निश्चितच प्राचार्य पुराणे यांच्याकडे जाते. असे गौरवोद्गार ग्रामपंचायत सदस्या नीलिमा थोरात यांनी व्यक्त केले. 

        यावेळी स्कूल कमिटीचे सदस्य पुरुषोत्तम लगड  म्हणाले की; ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांचे शैक्षणिक क्षेत्रासह पत्रकारिता क्षेत्रात मोठे योगदान लाभत आहे. त्यामध्ये गुणवंत विद्यार्थी; शाळेचे विविध उपक्रम व तालुक्यातील सर्व क्षेत्रातील घडामोडींची अचूक माहिती याबाबत अभ्यासपूर्ण लिखाण करून एक वेगळा ठसा पत्रकारिता क्षेत्रात श्री कुरुमकर यांनी निर्माण केला आहे. त्यांची तालुका पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड ही त्यांच्या कार्य कर्तुत्वाची ओळख असल्याचे श्री लगड यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

         यावेळी लोणी व्यंकनाथ सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री बाळासाहेब थोरात; नागवडे कारखान्याचे माजी संचालक व स्कूल कमिटीचे सदस्य विलासराव नाना काकडे; स्कूल कमिटीचे सदस्य अकबरभाई इनामदार; पुरुषोत्तम लगड,गावचे पोलीस पाटील मनेष जगताप; अक्षय गायकवाड; प्राचार्य श्री आनंदा पुराणेसर प्रा सचिन लगड; प्रा निसार शेख; प्रा पुष्पलता पाचपुते; श्री एकनाथ नेटवटे; राहुल येरकळ श्रीमती राहींज मॅडम यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्रकाश म्हस्के
संपादक

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते