जग बदलणारा बापमाणूस पुस्तकाला राज्यस्तरीय लोकराजा शाहू पुरस्कार, कोलंबिया विद्यापीठ अमेरिका येथे प्रकाशित झालेले पहिले मराठी पुस्तक
By : Polticalface Team ,14-12-2024
करमाळा(प्रतिनिधी); करमाळा तालुक्यातील हिवरे गावचे सुपुत्र
लेखक जगदीश ओहोळ लिखित जग बदलणारा बापमाणूस या प्रेरणादायी पुस्तकाला मानाचा राज्यस्तरीय लोकराजा शाहू पुरस्कार 2024 शनिवारी प्रदान करण्यात आला. इचलकरंजी येथे झालेल्या ११ व्या भव्य शाहू महोत्सवात मा. उपनगराध्यक्ष रवीसाहेब रजपुते यांच्या हस्ते व शाहू महोत्सवाचे आयोजक अरुण कांबळे, मुख्याध्यापिका मंजुषा राऊळ मॅडम, सचिव अक्षरा कांबळे आदींच्या उपस्थितीत व्याख्याते व लेखक जगदीश ओहोळ यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
जग बदलणारा बापमाणूस हे पुस्तक महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित मोटिव्हेशनल पुस्तक आहे. कोलंबिया विद्यापीठ अमेरिका येथे प्रकाशित होणारे हे पहिले मराठी पुस्तक आहे. तर केवळ बारा महिन्यात पंचवीस आवृत्त्या प्रकाशित झाल्याने हे पुस्तक साहित्य विश्वात सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहे.
यावेळी बोलताना माजी उपनगराध्यक्ष रवीसाहेब रजपुते म्हणाले की, जग बदलणारा बापमाणूस हे पुस्तक नव्या पिढीला प्रेरणादायी भाषेत बाबासाहेब सांगणारे जबरदस्त पुस्तक आहे. अशा पुस्तकाला लोकराजा शाहू महाराजांच्या नावे पुरस्कार देताना आम्हा कोल्हापूरकरांना विशेष आनंद वाटतो.
या पुरस्काराबद्दल लेखक जगदीश ओहोळ यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
वाचक क्रमांक :