दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता ०५ मार्च २०२५ दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर व गाडमोडी चौकात जोरदार अनधिकृत अवैध कल्याण मटका जुगार धंदे सुरू आहेत. यामागे नेमका कोणात्या आका बोकाचा वरदहस्त आहे. त्यामुळे मटका किंग निडरपणे अवैध धंदे भर चौकात खुले आम चालवून घेत आहेत. असा नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कल्याण मटका जुगार अड्ड्यावर युवा तरुणांना कमी वेळात अधिक माया कमावण्याची प्रबळ इच्छा बाळगून अनेक युवा तरुणांची घरे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. कल्याण मटका जुगाराच्या धंद्यामुळे युवा तरुण पिढी बिघडली आहे. किशोरी वयातील मुलांमध्ये नको ते प्रकार घडू लागले आहेत. यवत पोलीस स्टेशन हद्दीत मिसिंग च्या अनेक घटना घडल्या आहेत याला नेमके जबाबदार कोण ? कल्याण मटका स्वरट जुगार चालवणाऱ्या महाठकांचा तत्काळ बंदोबस्त करा. अशी मागणी नागरीकांकडून केली जात आहे
मौजे सहजपुर गाडमोडी हद्दीतील अनधिकृत बेकायदेशीर अवैध धंदे सुरू करण्यासाठी कोणाची मेहेरबानी आहे ? कल्याण मटका स्वरट जुगार सौदे घेऊन वसुली करतंय तरी कोण ? या मागे नेमका कोणाचा वरदहस्त आहे. त्यामुळे मटका बाहाद्दर निडरपणे भर चौकात अवैध धंदे चालवत आहेत. याकडे यवत पोलीस प्रशासनाने जाणिवपूर्वक दुर्लक्ष का केले जात आहे. पोलीस प्रशासनावर राजकीय आका बोका यांचा कोणाचा दबाव आहे काय ? त्यामुळे कल्याण मटका किंग मुजोर झाले आहेत. हॉटेल ढाब्यावरील बेकायदेशीर देशी विदेशी दारू विक्री अवैध धंदे तत्काळ बंद करा. अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे युवा तरुण पिढी मटका जुगार हातभट्टी दारुच्या नादी लावून अनेकांचे आयुष्य बरबाद झाले आहेत तर काही जीवाशी मोकले आहेत याला जबाबदार कोण ? कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे. असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख याकडे लक्ष देतील काय ? कल्याण मटका स्वरट जुगार अड्ड्याला पायबंद घालतील का अशा अनेक उलटसुलट चर्चा नागरीकांमध्ये होत आहेत सहजपुर गाडमोडी खामगाव राहु परीसरातील अवैध धंदे बंद होतील काय ? याकडे सर्व सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.
वाचक क्रमांक :