श्री व्यंकनाथ विद्यालयाने शंभर दिवस विविध उपक्रमांचे विस्ताराधिकाऱ्यांकडून समाधान
By : Polticalface Team ,11-03-2025
लिंपणगाव( प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्री व्यंकनाथ विद्यालयाने शिक्षण विभागाने माध्यमिक स्तरावर शंभर दिवस उपक्रमांतर्गत घालून दिलेल्या उपक्रमाचे तंतोतंत पालन करून विद्यालयात सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्याने माध्यमिक शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी भीवसेन पवार यांनी विद्यालय तपासणीत समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान सोमवारी 10 मार्च रोजी माध्यमिक विभागाचे विस्तार अधिकारी श्री भिवसेन पवार यांनी विद्यालयात भेट देऊन विद्यालयाने विविध उपक्रमांचे तंतोतंत पालन केले आहे. तर विद्यालयाच्या तपासणी दरम्यान विद्यालयाचा स्वच्छ परिसर सीसीटीव्ही कॅमेरे चालू अवस्थेत दिसून आले. सखी सावित्री समिती स्थापन करून त्याचे इतिवृत्त नोंद सुस्थितीत दिसून आली. विद्यालयाचे सुशोभीकरण तसेच विविध वृक्षांची लागवड याप्रसंगी दिसून आली. मुला मुलींचे स्वच्छतागृह स्वतंत्र अवस्थेत असून स्वच्छता देखील उत्तम प्रकारे आहे. विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्यासाठी आरो फिल्टर चे पाणी उपलब्ध असल्याचे दिसून आले. विद्यालयात परसबाग; सौंदर्यपूर्ण असून; एकंदरीत शाळेचे शैक्षणिक वातावरण अत्यंत चांगल्या प्रकारे असल्याचा अभिप्राय विस्तार अधिकारी श्री पवार यांना दिसून आला. विद्यार्थ्यांची शालेय शिस्त सर्व वर्गांमध्ये अध्यापनाचे कामही शिक्षकांकडून चांगल्या प्रकारे समाधानकारकरीत्या दिसून आले आहे. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री ए. एल. पुराणे यांनी विद्यालयाच्या विविध उपक्रमाची इथंभूत माहिती यावेळी विस्तार अधिकाऱ्यांना यावेळी सांगितली. त्यामुळे श्री व्यंकनाथ विद्यालयाचे शैक्षणिक कामकाज अत्यंत समाधानकारक असल्याचा अभिप्राय देखील विस्तार अधिकारी भिवसेन पवार यांनी दिला. विद्यालयाच्या तपासणीनंतर प्राचार्य पुराणे यांनी विस्तार अधिकाऱ्यांचा सन्मान केला. यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक शिवाजी इथापे यांनी केले. आभार ज्येष्ठ शिक्षक ज्ञानदेव धायगुडे यांनी मानले.
वाचक क्रमांक :