पाटबंधारे विभागाच्या हद्दीत पत्रा शेड तयार करून १ लाख ५० हजार घेऊन विक्री. निराधार विधवा महिलेची फसवणूक.
By : Polticalface Team ,27-02-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता २५ फेब्रुवारी २०२५ दौंड तालुक्यातील मौजे सहजपुर जावजी बुवाची वाडी ता दौंड जिल्हा पुणे येथील. मुळा मुठा कालवा कॅनॉल लगत असलेल्या पाटबंधारे विभागाच्या जागेमध्ये पत्रा शेड घरामध्ये घुसून आसिफ शेख व शबनम शेख यांनी ताबा घेतला. वास्तविक पाहता हे पत्रा शेड ज्ञानोबा लक्ष्मण सुरवसे यांच्या नावे सहजपुर ग्रामपंचायत दप्तरी (८ अ ) नोंद दि.२९/०७/२०१९ रोजी ठराव मंजूर करून नोंद दिसून येत आहे सदर पत्रा शेडमध्ये आसिफ शेख व शबनम शेख यांच्या ताब्यात असल्याने. ज्ञानोबा लक्ष्मण सुरवसे यांनी दि २९/०४/२०२४ रोजी यवत पोलीस स्टेशन येथे आसिफ शेख व शबनम शेख यांच्या विरुद्ध तक्रारी अर्ज केला होता. यवत पोलीस प्रशासनाने या अर्जाच्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई केली असती तर आज हसिना सय्यद गुलाब शहा या निराधार विधवा महिलेची १ लाख ५० हजार रुपयाची फसवणूक झालीच नसती अशी चर्चा पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये होत आहे.
यवत पाटबंधारे विभाग कार्यालयाकडून सहजपुर जावजी बुवाची वाडी येथील कॅनॉलच्या लगत असलेल्या जागेवर झोपडपट्टीतील नागरिकांचे अतिक्रमण हटाव बाबत काही दिवसांपूर्वी नोटीस बजावली असल्याचे बोलले जात आहे. मात्र वरिष्ठ कार्यालय सिंचन भवन यवत पाटबंधारे विभागाकडून अद्याप कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही. या बाबत स्थानिक नागरीकांनमध्ये पाटबंधारे विभाग अधिकारी यांच्या शासकीय कामकाजा बाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. जावजी बुवाची वाडी येथील पत्रा शेड अतिक्रमण धारक आसिफ शेख व शबनम शेख यांनी बेकायदेशीर पत्रा शेडचे घर विक्री करून. हसिना सय्यद गुलाब शहा या निराधार विधवा महिलेची फसवणूक झाल्याचे कारणा वरून यवत पोलीस स्टेशन येथे तक्रारी अर्ज देण्यात आला आहे.
फसवणूक झालेल्या महिलेच्या अर्जावरुन आसिफ शेख व शबनम शेख यांना यवत पोलीस स्टेशन येथे बोलविण्यात आले. तेव्हा पत्रा शेड घर विक्री व्यवहाराची बोलणी वेळी समक्ष हजर असलेले साक्षीदार १). सतिश गायकवाड २) सुखदेव राजवडे ३) संभाजी थोरात. सर्व राहणार जावजी बुवाची वाडी ता दौंड जिल्हा पुणे या स्थानिक नागरिकांना देखील बोलावण्यात आले होते सदर अर्जा बाबत चौकशी दरम्यान उपस्थित साक्षीदार यांनी
यवत पोलीस स्टेशन येथे येऊन घडल्या प्रकरणी जबाब दिला की आसिफ शेख व शबनम शेख यांना १ लाख ४० हजार रुपये हसिना सय्यद गुलाब शहा यांनी आमच्या समोर दिले आहेत असे सांगितले.
हसिना सय्यद गुलाब शहा या निराधार महिलेचे १ लाख ४० हजार रुपये घेऊन फसवणूक केल्या प्रकरणी अर्ज देण्यात आला असल्याने. अर्जदार व साक्षीदार आणि आसिफ शेख यांच्यामध्ये बराच वेळ हुज्जत झाली अखेर आसिफ शेख यांनी कबुल करुन काही वेळ मागितला मात्र अर्जदार यांचा त्याच्या बोलण्यावर विश्वास नसल्याने मी दिलेली सर्व रक्कम मला याच ठिकाणी परत द्यावी असे सांगितले मात्र आसिफ शेख व शबनम शेख यांनी पत्रा शेड विक्री बाबत घेतलेली रक्कम परत देण्याचे टाळाटाळ करीत दिशाभूल करणारी वक्तव्य करू लागला असल्याचे दिसून आले आहे त्यामुळे हसिना सय्यद गुलाब शहा यांच्या तक्रारी अर्जावरून व समक्ष साक्षीदार यांच्या जबाबात वरुन यवत पोलीस प्रशासन पुढील कायदेशीर कारवाई करण्याच्या दृष्टीने कामकाज सुरू करण्यात आले आहे.
पाटबंधारे विभागाच्या हद्दीत अतिक्रमण करायचे पत्रा शेड तयार करून बेकायदेशीर विक्री करायची हा कोणता कायदा आहे ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की. तीन वर्षांपूर्वी तक्रारदार हसीना सय्यद गुलाब शहा निराधार विधवा महिलेची कायदेशीर सोडचिठ्ठी झाली होती. त्यामध्ये तीला काही रक्कम मिळाली होती. मुस्लिम समाजातील निराधार विधवा असल्याने चांगल्या लोकांच्या ठिकाणी कुठे तरी निवारा असावा या दृष्टीने जावजी बुवाची वाडी येथील मुस्लिम समाजातील आसिफ शेख व शबनम शेख यांच्याकडून पत्रा शेड असलेले एक घर १ लाख ५० हजार रुपय ठरवून स्थानिक चार लोकांच्या समक्ष १ लाख ४० हजार रुपये रोख देऊन हसिना सय्यद गुलाब शहा यांनी विकत घेतले होते. काही दिवसांपूर्वी निराधार महिला नातेवाईकांकडे गेली होती निराधार असल्याने इकडे तिकडे राहणे चुकीचे ठरेल अशी मानसिकता करून धार्मिक स्थळ दर्गा शरीफ अशा ठिकाणी राहून उदरनिर्वाह जीवन जगण्याचा मार्ग हसिना सय्यद गुलाब शहा या निराधार महिलेने पत्करला होता.
आसिफ शेख व त्यांच्या पत्नी शबनम शेख यांनी आपण विकत घेतलेले घर पत्रा शेडचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला असुन
आसिफ शेख व शबनम शेख यांनी पत्रा शेडला लावलेले कुलूप तोडून घरातील सर्व साहित्य विकुण घराचा ताबा पुन्हा घेतला आहे असे हसिना सय्यद गुलाब शहा यांना स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे.
या बाबत आसिफ शेख व शबनम शेख यांना मोबाईल फोन संपर्क साधुन विचारले असता उलट सुलट टोलवाटोलवीची उत्तरे देऊन दिशाभूल करुन दिलेली रक्कम हडपण्याचा कट आखला असल्याचे दिसून आले यवत पाटबंधारे विभाग कार्यालय यांच्याकडून अतिक्रमण हटाव नोटीस आले असल्याचे आसिफ शेख यांनी मोबाईल फोन वर बोलताना सांगितले. तेव्हा हसिना सय्यद गुलाब शहा यांनी जावजी बुवाची वाडी येथील घेतलेल्या घरी येऊन खरी वस्तुस्थिती पाहुन यवत पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्याचे निश्चित केले. निराधार विधवा महिलेची फसवणूक केली जात आहे या बाबत स्थानिक नागरीकांनी माणुसकीचा धर्म म्हणून निराधार महिलेच्या मदतीला धावून आले. यवत पोलीस स्टेशन येथे हजर होऊन आसिफ शेख व शबनम शेख यांच्या बेकायदेशीर कर्तुत्वाचा बुरखा फाडून समक्ष चर्चा करून खुलासा केला असल्याने असिफ शेख गडबडून गेला व चर्चा सुरू असताना यवत पोलीस स्टेशन मधुन गुपचूप पळून गेला तो परत आलाच नाही. जावजी बुवाची वाडी येथील पाटबंधारे विभागाच्या हद्दीत पत्रा शेड तयार करून १ लाख ५० हजार घेऊन निराधार विधवा महिलेची फसवणूक केली असल्याने यवत पोलीस स्टेशन येथे हसिना सय्यद गुलाब शहा यांच्याकडून तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. झोपडपट्टी मधिल गोरगरीब कुटुंबांची होणारी आर्थिक फसवणूक कधी थांबणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कासुर्डी भोंडवे वस्ती येथील कै अशोक होले यांची पत्नी सध्या पोलीस खात्यामध्ये असून त्यांनी दोन दिवसांपूर्वी यवत पोलीस स्टेशन येथे आसिफ शेख व शबनम शेख यांच्या विरुद्ध तक्रारी अर्ज दिला आहे. पाटबंधारे विभागाच्या सरकारी जागेवर अतिक्रमण करून पत्रा शेड तयार करणे आणि लाखो रुपये घेऊन गोरगरीब कुटुंबाला विकणे हा सर्रास उपक्रम राबविला जात असुन झोपडपट्टीतील बेघर गोरगरीब मोलमजुरी करून पोटाची खळगी भरण्यासाठी पराकाष्ठा करणाऱ्या कुटुंबांनी सावधगिरी बाळगणे काळाची गरज आहे. यवत पोलीस स्टेशन येथे हसिना सय्यद गुलाब शहा यांच्या दिलेल्या तक्रारी अर्जावरून चौकशी करून आसिफ शेख व शबनम शेख यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याच्या दृष्टीने कामकाज सुरू करण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. यवत पोलीस प्रशासनाकडून हसिना सय्यद गुलाब शहा या निराधार विधवा महिलेला न्याय मिळेल का? याकडे पंचक्रोशीतील अनेक नागरीकांचे लक्ष लागले आहे.
वाचक क्रमांक :