दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता २२ फेब्रुवारी २०२५ दौंड तालुक्यातील मौजे कासुर्डी तालुका दौंड जिल्हा पुणे येथील पुणे सोलापूर महामार्गा पासून काही अंतरावर असलेल्या मुळा मुठा कालवा कॅनोल पुलाचे बांधकाम गेली काही महिन्या पासून सुरू झाले होते. त्यामुळे कासुर्डी ग्रामस्थांना मुळा मुठा कालव्यात उतरून ए जा करण्याची परिस्थिती निर्माण झाली होती तसेच मोटर सायकल प्रवासी यांना मोठी कसरत करावी लागत होती. शालेय विद्यार्थी देखील याच मार्गाने चढ उतार करुन प्रवास करीत होते. चार दिवसांपूर्वी मुळा मुठा कालवा कॅनोला पाणी आले असल्याने कासुर्डी गावचा मुख्य मार्गच खंडित झाला आहे. सदर कालव्यावरील पुलाचे बांधकाम एवढ्या वेळेत पूर्ण होणे अपेक्षित होते परंतु तसे झाले नाही.
त्यामुळे कासुर्डी ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे
मुळा मुठा कालवा कॅनोला पाणी आल्याने कासुर्डी गावातील सर्व नागरिकांना व विद्यार्थी मुलांना दुरवरुन वळसा घालुन प्रवास करावा लागत आहे.
कासुर्डी गावातील गायकवाड वस्ती पासून जुना पांदण रस्ता व कासुर्डी ते यवत शिवच्या रस्त्याची अतिशय बिकट परिस्थिती आहे. अनेक वर्षापासून या रस्त्यावर प्रवासी वर्दळ बंद असल्याने रस्त्याची अवस्था बिकट आहे. या रस्त्यावर तात्पुरते तरी मुरमीकरण होणे आवश्यक असल्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. हा रस्ता कासुर्डी ते यवत हद्दीतील रामदास अण्णा दोरगे यांच्या वस्तीपर्यंत सलग पुणे सोलापूर हायवे मार्गाला येऊन मिळत आहे.
तसेच खामगाव फाटा ते कासुर्डी गावात पायदळ वाट असुन मुळा मुठा कालवा कॅनोल वर पाच फूट अरुंद पुलावरून ग्रामस्थांना व विद्यार्थ्यांना पायदळ प्रवास करावा लागत आहे.
भोंडवे वस्ती मार्गावरून कासुर्डी गावातील सर्रास शेतकऱ्यांना शेती मालवाहतूक करावी लागत आहे. शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर बैलजोडी व इतर शेती कामासाठी साहित्य वाहतूक करण्यासाठी भोंडवे वस्ती या मार्गाने प्रवास करावा लागत आहे. हा वळसा घालून प्रवास किती दिवस करावा लागेल हे मात्र सांगता येत नाही.
संबंधित ठेकेदार यांच्या दिरंगाई मुळे सदर चे मुळा मुठा कालवा कॅनोल पुलाचे बांधकाम संत गतीने होत असल्याने पूर्ण होऊ शकले नाही अशी प्रतिक्रिया कासुर्डी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष नानासाहेब जगताप व कासुर्डी वि का सोसायटीचे माजी चेअरमन उत्तमराव सोनवणे यांनी बोलताना सांगितलं. तसेच भिमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक गोपीनाथ भोंडवे वारकरी संप्रदाय भुलेश्वर दिंडीचे अध्यक्ष माणिक आबा गायकवाड. सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब राजवडे आदी कासुर्डी गावातील समस्त ग्रामस्थ शेतकरी यांच्याकडून कासुर्डी ते यवत शिवचा पांदण रस्ता दुरुस्तीची करण्याची मागणी केली जात आहे.
वाचक क्रमांक :