यवत गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व महालक्ष्मी यात्रा उत्सवानिमित्त. मंगला बनसोडे मा.नितिनकुमार बनसोडे (करवडीकर) व मालती इनामदार लोकनाट्य तमाशा मंडळ (नारायणगांवकर) यांचा बहुरंगी तमाशा
By : Polticalface Team ,06-02-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता ०६ फेब्रुवारी २०२५ दौंड तालुक्यातील मौजे
यवत ता. दौंड जि.पुणे. येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व महालक्ष्मी मातेचा यात्रा उत्सव बुधवार दि. १२/०२/२०२५ व गुरूवार दि.१३/०२/२०२५ रोजी श्री काळभैरवनाथ व श्री महालक्ष्मी मातेचा उत्सव देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत. या उत्सवात सालाबाद प्रमाणे ढोल ताशे लेझिम पारंपरिक वाद्य पथक इतर सांस्कृतिक खेळ तसेच भजनी मंडळे छडी पट्टे खेळ व इतर लोककलेच्या माध्यमातून कलाकार उत्कृष्ट आकर्षित प्रदर्शन करणार आहेत. यवत गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व महालक्ष्मी उत्सव (माही पौर्णिमा) बुधवार दि १२ फेब्रुवारी यात्रा उत्सव आणि गुरुवार दि १३ फेब्रुवारी २०२५ रोजी (हागामा) सायंकाळी नामांकित पहिलवानांचा कुस्ती आखाडा जोरदार रंगणार असून नामांकित पैलवानांची कुस्ती चितपट व्हायला हवी. देवस्थान ट्रस्ट पंच कमिटीचा अंतिम निर्णय राहील.
पहिलवान मंडळींनी आपल्या मित्र सहकाऱ्यांनी कुस्ती आखाड्यात सहभाग घेऊन मानाचे पारितोषिक व इनाम जिंकून नावलौकिक करण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे त्यामुळे यात्रा उत्सवास अवश्य उपस्थिती दर्शवावी असे आव्हान समस्त ग्रामस्थ देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच पारंपारिक मर्दानी खेळ पथक. ढोल ताशे वाद्य कला पथकांनी देवस्थान ट्रस्टीकडे पालखी छबिण्यापूर्वीच आपल्या पथकाची नाव नोंदणी करून छबिन्यामध्ये सहभाग घेऊन श्री काळभैरवनाथ व श्री महालक्ष्मी माता उत्सवाची शोभा वाढवावी
अशी यवत देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने महत्त्वाची विनंती करण्यात आली आहे.
विशेष सुचना : या यात्रा उत्सवामध्ये या वर्षी पारंपरिक ढोल ताशे लेझिम मर्दानी खेळ अशा विविध उत्कृष्ट कला पथकांचे १ ते १३ पथकांचे नंबर काढण्यात येणार असून, गुणवत्तेप्रमाणे जास्तीत जास्त इनाम देण्यात येणार असल्याचे देवस्थान यात्रा कमिटीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
या उत्सवातील प्रमुख कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे असे
बुधवार दि.१२/०२/२०२५ रोजी सकाळी ५ ते ६ श्री नाथांची महापुजा, ६ ते ९ देवाला पाणी घालणे, ९ ते ११ देवांचा पोषाख, ११ ते ६ दंडवत व नैवद्य, सायं. ६ ते ८ काटयांची सवाद्य मिरवणूक, ९ ते १२ देवाची पालखी छबीना दरम्यान श्री काळभैरवनाथ मंदिरा समोर फटाक्यांची आतषबाजी करून सवाद्य ढोल ताशे पथकांच्या धुमधडाक्यात पालखी मिरवणूक होणार असुन या पालखी छबिन्यामध्ये डीजे लावण्यास संत्त मनाई करण्यात आली आहे डीजे वाले आल्यास यवत पोलीस प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आव्हान समस्त देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे.
बुधवार दि.१२/०२/२०२५ रोजी रात्रौ संगिताची राणी मंगला बनसोडे सोबत मा.नितिनकुमार बनसोडे (करवडीकर) यांचा लोकनाट्य तमाशा.
गुरूवार दि.१३/०२/२०२५ रोजी सकाळी ९ ते दु.१ वा. पर्यंत संगिताची राणी मंगला बनसोडे सोबत मा.नितिनकुमार बनसोडे (करवडीकर) यांचा लोकनाट्य तमाशा (हज-यांचा) कार्यक्रम होईल.
गुरूवार दि.१३/०२/२०२५ रोजी दु.४ ते सायं. ७ वा. पर्यंत नामवंत पहिलवानांचा कुस्त्यांचा जंगी आखाडा. इनाम रु.५० ते २५००१/- पहिलवान यांचा खेळ पाहून दिला जाईल. अंतिम निर्णय पंचांचा असेल
राष्ट्रपती सुवर्ण पदक विजेती स्वर्गीय विठाबाई भाऊ (मांग) नारायणगांवकर यांची रत्नकन्या मालती इनामदार लोकनाट्य तमाशा मंडळ (नारायणगांवकर)
श्री काळभैरवनाथ व महालक्ष्मी मातेचा यात्रा उत्सवातील सर्व कर्मणुक सांस्कृतिक कार्यक्रमात आनंद व्यक्त करुन यात्रा उत्सव सुखरूप पार पाडावा. यात्रा उत्सवाला गालबोट लागेल असे गैरप्रकार करू नये. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करावा अन्यथा कोणाचीही गई केली जाणार नाही अशी प्रतिक्रिया यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी बोलताना व्यक्त केली आहे.
गुरूवार दि.१३/०२/२०२५ रोजी रात्रौ ९ ते १ पर्यंत तमाशा होईल. व्यवस्थापक : श्री काळभैरवनाथ देवस्थान व इतर देवस्थान ट्रस्ट समस्त ग्रामस्थ यवत
वाचक क्रमांक :