केंद्र सरकारने केलेले नवीन चार कामगार कायदे रद्द करावे यासाठी सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी इंटर जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने
By : Polticalface Team ,06-02-2025
जेऊर प्रतिनिधी
देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने मागील दहा वर्षात कामगार क्षेत्रातील संघटीत कामगारांचे न्याय हक्क डावलून भांडवलदारांना पूरक ठरतील अशी धेय्य धोरणे राबवली आहेत. या निषेधार्थ आज दि. 5/02/2025 बुधवार रोजी अमोल जाधव सोलापूर जिल्हा अध्यक्ष( इंटक)काँग्रेस याच्या मार्ग दर्शना खाली सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी निवेदन देण्यात आले व आंदोलन करण्यात आले यावेळी जाधव म्हणाले की प्रचलित कामगार कायदे रद्द करून नवीन चार कामगार कायदे केले आहेत कामगार कायद्यात बदल करावा अशी देशातील कोणत्याही कामगार संघटनाची मागणी नव्हती कोरोना काळात देशभर लॉक डाऊन असताना संसदेत देशाचे विरोधी पक्ष नेते व कोणत्याही विरोधी पक्षाला विश्वासात न घेता केंद्र सरकारने हे कायदे कामगारांनवर लादले आहेत नवीन कामगार कायद्यामुळे आर्थिक सामजिक कौटुंबिक अस्तित्व धोक्यात आलेले आहे.
कायद्यातील दुरुस्ती मुळे कायम कामगार हि संज्ञा लोप पावणार आहे. त्या मुळे देशभरातील कामगार शेत्रातील संघटीत असंघटीत कामगाराम्ध्ये केंद्र सरकार विरुद्ध तीव्र असंतोष आहे कामगारांच्या भावना केंद्र सरकार पर्यंत पोहचविन्यासाठी आम्ही वेळोवेळी निदर्शीने, लाक्षणीक उपोषण, धरणे आंदोलन, संम्प या माध्यमातून नेषेध केला. आहे केंद्र सरकारला जागे करण्यासाठी देश भरतील कामगार संघटनांची वज्रमुठ तयार झालेली असून आत्ता हा लढा आणखी तीव्र पने लढण्याचा निर्धार सर्व कामगारांनी केला आहे.
कामगारांच्या या भावना आपण राष्ट्रपती श्रीमती द्रोपदि मुर्म , पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसूख मांडविया तसेच महाराष्ट्रचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व कामगार मंत्री श्रीआकाश फुंडकर यांच्यापर्यंत पोहचवाव्यात.
नवीन कामगार कायद्यामुळे कामगारांची व त्यांच्या कुटुंबियांची पुढील पिढीचे भवितव्य धोक्यात आले आहे देशाच्या सर्वांगीण विकासात कामगारांचे आणि कष्ट करांचे मोलाचे योगदान आहे या नवीन कायद्या मुले सर्व शेत्रातील कामगार उद्वस्थ होतील त्या मुळे देशात बेरोजगारी गुन्हेगारी वाढण्याचा धोका आहे परिणामी देशच्या विकासावर देखील याचे दुरगामी परिणाम होतील आणि देश पुन्हा गुलामगिरीच्या खायेत लोटला जाईल अशी भीती व असंतोषाचे वातावर कामगारामध्ये पसरलेले आहे त्यामुळे देशभरातील कोट्यावधी जनतेच्या मनात तीव्र असंतोषाची आणि असुरक्षतेची भावना निर्माण झालेली आहे याची आपण गांभीर्याने दखल घ्यावी अशी आपणास सोलापूर काँग्रेस (इंटकच्या) वतीने नम्र विनंती
वाचक क्रमांक :