भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा उरुळी कांचन. माता रमाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती उत्साहात साजरी.
By : Polticalface Team ,08-02-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता ०८ फेब्रुवारी २०२५ भारतीय बौध्द महासभा उरुळी कांचन पूर्व हवेली तालुका अंतर्गत ग्रामशाखा येथील सिद्धार्थ यशोधरा सामाजिक संस्था व रमाई महिला मंडळ यांच्या मार्फत शुक्रवार दि ०७ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य संघटक तसेच केंद्रीय शिक्षिका पुणे जिल्हा प्रभारी महिला मान्यवर राजश्री ताई सरवदे माजी जिल्हाध्यक्ष रघुनाथ साळवे गुरुजी पुणे जिल्हा संघटक बी जी घाटे गुरुजी तालुका हवेली पूर्व सरचिटणीस विजय गायकवाड गुरुजी यांच्या हस्ते माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी उरुळी कांचन पंचक्रोशीतील सर्व बौद्ध उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनातील सखोल त्याग व कष्टाचा आदर्श घेऊन आपले जीवन व जबाबदारी स्वीकारली तर आर्थिक बचत व उन्नती झाल्या शिवाय राहणार नाही.
डॉ बाबासाहेब आंबेडकर परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी गेले असताना माता रमाईने घेतलेली जबाबदारी महत्त्वाची ठरते त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर जगातील सर्वश्रेष्ठ घटनाकार बनले. लाखो अस्पृश्य बहुजन समाज बांधवांना न्याय हक्क व स्वतंत्र अधिकार संविधानाच्या माध्यमातून मिळवून दिला. गुलामीत अडकून खितपत पडलेला समाज आज सर्वपरीने सक्षम झाला आहे या उपकाराची परतफेड करा ? गेले ते दिवस विसरून जाऊ नका. जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज कधीच इतिहास घडवू शकत नाही. असा संदेश डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे. त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांनी
बाबासाहेबांच्या उच्च शिक्षणासाठी महत्त्वाची जबाबदारी घेऊन साथ दिली. अशा अनेक आठवणींना उजाळा देऊन मान्यवरांनी
उपस्थित बौद्ध महिलांना मार्गदर्शन केले.
भारतीय बौध्द महासभा. ग्रामशाखा उरुळी कांचन पूर्व हवेली तालुका अंतर्गत सिद्धार्थ यशोधरा सामाजिक संस्था व रमाई महिला मंडळ यांच्या मार्फत आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्व हवेली चे प्रचार पर्यटन उपाध्यक्ष आयु महेश जी गायकवाड यांनी केले. व हा संपूर्ण कार्यक्रम पूर्व हवेलीचे संस्कार उपाध्यक्ष तसेच केंद्रीय शिक्षक बाबासाहेब कांबळे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडला या प्रसंगी मोठ्या संख्येने बौद्ध महासभेचे पदअधिकारी सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी तसेच महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
वाचक क्रमांक :