पाटस येथे तक्षशिला बुध्द विहारात रमाई माता जयंती उत्साहात साजरी. संघर्षमय माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर प्रबोधन.
By : Polticalface Team ,08-02-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता ०७ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यागमूर्ती माता रमाई जयंती निमित्त तक्षशिला बुध्द विहार, पंचशिल नगर येथे सर्व समाज बांधव एकत्र येऊन रमाई जयंती साजरी केली. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते
या प्रसंगी सर्वप्रथम माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन माजी सभापती सरिकाताई राजेंद्र पानसरे व उपस्थीत सर्व महिलांचे हस्ते करण्यात आले.
या वेळी फुले शाहू आंबेडकर चळळीतील थोर विचारवंत जेष्ठ अभ्यासक प्राचार्य विजयराव दादू रोकडे सर यांचे माता रमाई यांचे जीवनावर, समाज कार्यावर आधारित सुंदर व्याख्यान झाले. या दरम्यान माई रमाईचा त्याग, समाजासाठी त्या वेळी त्या काळी पोटची चार मुलं गमावून सुद्धा संसारात कुठलीही अपेक्षा न ठेवता कष्ट करून बाबासाहेबांच्या उच्च शिक्षणासाठी केलेली आर्थिक मदत. बाबासाहेबाना कायम दिलेली बहुमूल्य साथ संघर्षमय माता रमाई यांचा एकंदरित संपूर्ण जीवन प्रवास या विषयावर प्राचार्य रोकडे सरांनी उपस्थित बौद्ध महिलांना व्याख्यानाच्या माध्यमातून प्रबोधन केले या प्रसंगी विहारातील वातावरण धम्ममई झाले होते.
या प्रसंगी विहाराचे जेष्ठ सभासद रोहिदास पानसरे कृष्णा पानसरे अरुण पानसरे गौतम पानसरे विजय पानसरे पाटस ग्रामपंचायत विद्यमान सदस्य राजेश सोनवणे यांचे हस्ते प्राचार्य रोकडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रमास महिलांचा विशेष सहभाग व उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विहाराचे सभासद श्रेयस पानसरे सूरज पानसरे शिवधन पानसरे मंगेश पानसरे सुजित पानसरे शैलेश पानसरे व इतर सर्व युवा सभासदांनी विशेष परिश्रम घेतले.
सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन विहाराचे मयुर पानसरे यांनी केले. शेवटी सर्वांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती सर्वांनी स्नेह भोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. पाटस येथील तक्षशिला बुध्द विहार राहूल युवक मंडळाचे सर्व कार्यकारिणी सभासद यांचे वतीने उपस्थित सर्वांचे आभार मानण्यात आले.
वाचक क्रमांक :